Headlines

उत्सव:'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात संत गुलाबराव महाराज पालखीचे कुर्डुवाडीत उत्साहात आगमन




आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या चांदूरबाजार येथील श्री संत गुलाबराव महाराज पालखी दिंडीचे सायंकाळी कुर्डुवाडी शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च् या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. या पालखी दिंडीच्या कुर्डूवाडी येथील मुक्कामाचे हे ३७ वे वर्ष आहे. शहरात पालखीचे आगमन होताच, वागळे दवाखान्यासमोर कुर्डुवाडीच्या नगराध्यक्षा जयश्री भिसे, नगरसेविका अंजली गावडे, दिलीप उकरंडे, विशाल गावडे, विलास लाकुळे व मेजर महादेव कांबळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन व भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. आरती संपन्न झाल्यानंतर सर्व वारकरी व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. स्वागत सोहळ्यानंतर दिंडीने मुख्य मार्गावरून शहर प्रदक्षिणा केली आणि त्यानंतर ही पालखी कुबेर मंगल कार्यालयात विसावली. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी, विशेष पूजा आणि आरती संपन्न झाली. या सोहळ्याला पालखी प्रमुख मनोहर कायटे, अण्णा शेळके शहाणे उपस्थित होते. शनिवारी पहाटे पालखीची पारंपरिक ‘उत्तर पूजा’ आणि आरती करण्यात येईल. त्यानंतर हा सोहळा हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने रवाना होईल. कुर्डुवाडीकरांच्या परंपरेनुसार, सर्व नागरिक आणि भाविक या पालखी सोहळ्याला शहराच्या बाह्यवळण रस्त्यापर्यंत जाऊन भावपूर्ण निरोप देणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *