![]()
अकोट येथील सुप्रसिद्ध कालंका माता मंदिरात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या प्रकरणाचा तपास केल्याबद्दल राज्याच्या पोलिस महासंचालकांनी मुंबईत एलसीबीच्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान केला. पोलिसांच्या माहितीनुसार २२ फेब्रुवारी रोजी अकोटमधील बारागण येथील कालंका माता मंदिरातून अज्ञात चोराने देवीच्या मूर्तीवरील ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने व दानपेटीतील ७५० ग्रॅम चांदी, असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागे अमोल काशीराम तेलगोटे (३९), रा. रिठोरा, ता. बाळापूर, जि. अकोला हा असल्याचे निष्पन्न झाले.
Source link
अकोटच्या कालंका माता मंदिर चोरी प्रकरणाचा छडा:गुन्हे शाखेचा पोलिस महासंचालकांकडून सन्मान