![]()
मोर्शी-चांदूरबाजार मार्गावरील चिखलसावंगी फाट्याजवळ जळालेल्या ट्रकमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ ग्रामिण पोलिसांनी २४ तासात उकलले आहे. हा अपघात नसून ट्रकचालकाची हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आर्थिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृतकाची ओळख चंद्रपूर येथील ट्रकचालक उमेश गौरीशंकर मिश्रा अशी पटली आहे. गुरुवारी (दि. १६) पहाटे ट्रक जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयितांची ओळख पटवली. त्यानंतर मनप्रीतसिंग रंधावा याला जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून, तर दुसऱ्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले. खून करुन ट्रकचे टायर, बदलल्याने क्ल्यू मिळाला आरोपी वरुड ते मोर्शी मार्गावरील एका पंक्चर दुकानात गेले. त्या ठिकाणी त्यांनी मिश्रा यांच्या ट्रकचे टायर काढून स्वत:च्या पांढऱ्या ट्रकला लावले१२०० रुपये आरोपींनी पंक्चरवाल्याला दिले. ही रक्कम देतेवेळी आरोपींनी ऑनलाइन पेमेंट केले आणि ते रडारवर आले.
Source link
‘त्या’ चालकाची हत्या करून ट्रक पेटवून दिला; गूढ उकलण्यात यश:दोघे ताब्यात : एकाला गुजरात तर दुसऱ्याला रावेरमधून अटक