Headlines

पावसाचे 30 पैकी 25 यलो अलर्ट "फेल':चापडोह धरणातही पाणीसाठा कमी, जोरदार पाऊस न झाल्यास पाण्याची समस्या होणार गंभीर‎




यंदा पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० वेळा यलो पावसाचा अलर्ट देण्यात आला. मात्र यापैकी एकाही दिवशी पाऊस बरसला नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह या दोन्ही धरणांमध्ये क्षमतेच्या केवळ ८० टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे. सध्या सुरू असलेली पावसाची तूट अशीच कायम राहिल्यास शहरात येत्या काही महिन्यांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंद महासागरातील सुपर अलनीनो वादळाचा परिणाम होऊन यंदा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार जून महिना शेवटच्या आठवड्यापर्यंत कोरडा गेला. शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीस एक-दोन वेळा हजेरी लावलेला पाऊस पुन्हा बेपत्ता झाला. पावसाळ्याच्या दीड महिन्यात तब्बल ३० दिवस जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यापैकी एक-दोन दिवस सोडले, तर उर्वरित सर्व यलो अलर्ट कोरडे गेल्याचे दिसले आहे. जून महिन्यात ५ ते ७ जून, १३ ते १७ जून, २४ ते २७ जून असे एकूण १७ दिवस यलो अलर्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ २४, २६ आणि २७ जून या तीन यलो अलर्टच्या दिवशी पाऊस झाला. जुलै महिन्यात १ ते ५ जुलै, ६ ते ८ जुलै, १६ ते २० जुलै असे १३ दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यापैकी ३ दिवस अद्याप शिल्लक आहेत. उर्वरित १० दिवस दिलेल्या यलो अलर्टपैकी केवळ दोन दिवस, २ व ४ जुलै रोजी, पाऊस झाला. पावसाच्या अनियमिततेमुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह या दोन धरणांमध्ये ८० टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरवर्षी जुलै महिन्यात ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहत असतात. मात्र यंदा परिस्थिती विपरीत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *