![]()
जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे लाखो शेतकऱ्यांचा हंगाम धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि. १७) संतप्त वातावरण पाहायला मिळाले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एक नव्हे तर पाचही बियाणे कंपन्यांविरोधात जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये प्रत्येकी गुन्हे दाखल करून शुक्रवारी रात्रीपर्यंतच एकूण ७० एफआयआर नोंदवावेत, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाला दिले. याचवेळी गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना त्यांनी एसपींना दिल्यात. जिल्हा नियोजन समितीची तब्बल सहा महिन्यांनंतर झालेली बैठक शेतकरी प्रश्नावरच गाजली. जिल्ह्यातील सर्वच खासदार आणि आमदारांनी निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान अधोरेखित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अकोलाजिल्ह्यात विक्रीबंदी असलेल्या बूस्टर कंपनीचे बियाणेअमरावतीत विकलेच कसे गेले, याची चौकशी करण्याचीमागणी केली. पालकमंत्री बावनकुळे यांनी कृषी विभाग वजिपच्या कृषी विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रचंड नाराजीव्यक्त करत कारवाई प्रभावी दिसत नाही. प्रत्येक तालुक्याततातडीने गुन्हे दाखल करा. अन्यथा त्याची संपूर्णजबाबदारी कृषी विभागावर राहील असा स्पष्ट इशारा दिला.
Source link
पालकमंत्र्यांचा संताप:1639 शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासन जागे; पाच कंपन्यांविरोधात 70 गुन्हे दाखलचे आदेश