नागपूर शहरात सण-उत्सवांच्या काळात डीजे, अतिप्रखर लेझर लाईट्स आणि ध्वनिप्रदूषणावर घालण्यात आलेल्या निर्बंधांविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करत नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली. “पोलिस प्रशासनाचा प
.
पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
उत्सवाच्या काळात होणाऱ्या गंभीर उल्लंघनांवर बोलताना नांगरे पाटील यांनी कायदेशीर बाबींकडे लक्ष वेधले. सामान्यतः अशा प्रकरणांत मुंबई पोलीस कायद्यान्वये किरकोळ कारवाई होते. मात्र, अमर्याद आवाजाची भिंत उभारणे हा पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरतो. या कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असून सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचा यशस्वी अनुभव
नांगरे पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीतील अनुभवाचा दाखला देत सांगितले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (IGP) असताना त्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशीच नियमावली लागू केली होती. त्यावेळी 144 हून अधिक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गणेश मंडळांनी पोलिसांना अत्यंत सकारात्मक व रचनात्मक पाठिंबा दिला होता. तोच पॅटर्न आता नागपूरमध्ये राबवण्यात येत असून सर्व गणेश मंडळांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बैठका घेतल्या जात आहेत.

रेव्ह पार्ट्या, सायकेडेलिक लेझर आणि व्यसनांची जोड
मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईट्स आणि हाय-बेस साऊंड सिस्टीमच्या धोक्यांवर त्यांनी सखोल तांत्रिक माहिती दिली. “मी माझ्या सेवाकाळात तीन मोठ्या रेव्ह पार्ट्यांवर स्वतः छापे टाकलेले आहेत. या पार्ट्यांमध्ये जो ‘रॅडिकल ऑडिओ-व्हिज्युअल’ अनुभव असतो, तोच आजकाल सार्वजनिक मिरवणुकांमध्ये लेझर आणि ट्रान्स-म्युझिकच्या माध्यमातून आणला जात आहे.”
प्रखर लेझर बीम आणि प्रचंड बेस यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन हेलुसिनेशन (भास) निर्माण होतात. अशा प्रकारच्या तीव्र लेझर लाईट्स आणि ट्रान्स म्युझिकचा वापर अमली पदार्थांच्या व्यसनांकडे ओढणाऱ्या मानसिकतेला पूरक ठरतो. त्यामुळे अशा घातक तंत्रज्ञानाला आळा घालणे आवश्यक आहे.
आवाजाची भिंत बांधू नका; डेसिबल मर्यादा पाळा, पोलीसही तुमच्या ठेक्यावर ठेका धरतील
उत्सवाच्या मूळ परंपरेची आठवण करून देताना ते म्हणाले, 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्याचा मूळ हेतू लोकशिक्षण, प्रबोधन आणि पारतंत्र्यातील मरगळलेल्या मनांमध्ये नवी ऊर्जा फुंकणे हा होता.
भारतरत्न लता मंगेशकरांचे उदाहरण
लतादीदींनी आपल्या गायनाची सुरुवात पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केली होती. त्या नेहमी सांगायच्या की, स्पीकरची भिंत न उभारता ते योग्य अंतरावर पसरवून लावावेत, जेणेकरून मंजूळ स्वर तयार होतील आणि 64 कलांचा अधिपती असलेला गणपती बाप्पा प्रसन्न होईल.
“ध्वनीची डेसिबल मर्यादा पाळून उत्सव साजरा करा. चांगल्या ठेक्यावर आम्ही पोलीसही तुमच्या आनंदात सहभागी होऊन ठेका धरू. मात्र, नागरिकांचे आणि विशेषतः रुग्ण, वृद्ध व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या विकृतीला थारा दिला जाणार नाही.”
संवाद आणि लोकसहभागातून उत्सवाचे नियोजन
आपण स्वतः दर मंगळवारी सिद्धिविनायक किंवा स्थानिक टेकडी गणपतीचे दर्शन घेणारे भाविक असून, गावातील गणपतीच्या वर्गणीतून अभ्यासिका उभारून त्यातून अधिकारी घडल्याचे उदाहरण त्यांनी दिले. त्यामुळे गणपती बाप्पाच्या उत्सवाचा आम्हाला अभिमानच आहे. हा उत्सव कुठल्याही एका घटकाचा नसून सर्वसमावेशक आहे. लोकप्रतिनिधी, गणेश मंडळे आणि नागरिक यांच्याशी थेट संवाद साधून हा सण सुरक्षित आणि आनंदी वातावरणात पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा…
पुण्यात वाद, पण नागपुरात DJ वर थेट बंदी: 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे अन् लेझर लाईट पूर्णपणे बॅन; पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

गणेशोत्सवात एकीकडे पुण्यात डीजेवर प्रतिबंधाचा मागणी होत असताना आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण आणि लेझर लाईटमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची गंभीर दखल घेत नागपूर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरात डीजे, डॉल्बी साऊंड, मॉडिफाइड साऊंड सिस्टिम, डीजेची वाहने तसेच बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरावर 1 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी