![]()
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षांवर तसेच शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा मीडियासमोर रडले आहेत. रुदाली हिंदी चित्रपट आपण पाहिला असेल, ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासाठी असतात, त्या पद्धतीने त्यांचा रुदाली झाला असल्याची टीका म्हस्के यांनी केली आहे. नरेश म्हस्के म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की ते रडण्याचे काम करतात. रुदाली हा शब्दप्रयोग त्यांना अगदी चपखल बसतो आणि त्याच पद्धतीने अशी त्यांची वक्तव्य आहेत. ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, अभिजीत दिपके यांचे आंदोलन झाले त्याला साथ कोणी दिली? या देशातील तरुणांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशा पद्धतीने ही मंडळी त्या आंदोलनाचा भाग्यविधात स्वतःला क्रेडिट घेऊ इच्छितात. काही लग्नांमध्ये त्यांच्या आनंदामध्ये वरातीमध्ये नाचण्याकरता भाड्याने माणसं आणली जातात अशाच पद्धतीचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे युबीटी पक्ष करत आहेत, अशी बोचरी टीका म्हस्के यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचा काम करतायेत त्यांची बरोबर हे करु शकतात का? असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला आहे. ते म्हणाले, त्यांना ज्यावेळेस संधी दिली होती त्यावेळेस त्यांनी काही नाही केले. मोदीजी 24 तास काम करत आहेत. तुम्ही काय केले? मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील जात नव्हते, त्यामुळे उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली. कॉंग्रेस बरोबर संगत करून खुर्चीसाठी गद्दारी करून कॉंग्रेससोबत घरोबा केला, यालाच गद्दारी म्हणतात, अशी टीका म्हस्के यांनी केली. ठाण्यातील ड्रग्स प्रकरणी नरेश म्हस्केंची पोलिस आयुक्तांकडे कारवाईची मागणी दरम्यान, ठाणे शहरासह जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये ड्रग्जच्या व्यसनाचे प्रमाण वेगाने वाढत असून, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. आयुक्तांच्या कामकाजाचे कौतुक करतानाच म्हस्के यांनी स्पष्ट केले की, त्यांनी गेल्या आठवड्यात पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन शाळा-कॉलेज परिसरातील वस्त्यांमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या ड्रग्ज विक्रीची सविस्तर माहिती त्यांना दिली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याला मुंब्रा परिसरातून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची चर्चा असली तरी, केवळ एकाच भागापुरते मर्यादित न राहता मुंब्रा पोलिसांसह सर्वच यंत्रणांनी या रॅकेटच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रत्येक पोलीस ठाण्याला ड्रग्ज माफियांच्या मुळावर घाव घालून लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
Source link
उद्धव ठाकरे म्हणजे 'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना':त्यांना रुदाली शब्दप्रयोग चपखल बसतो, नरेश म्हस्केंची बोचरी टीका