Headlines

विश्रांतवाडी पोलिसांकडून 4.80 लाखांच्या 6 दुचाकी जप्त:20 वर्षीय संशयिताला अटक; वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल




विश्रांतवाडी पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना एका 20 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीच्या सहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. रामभवन यादव (वय 20, रा. शांतिनगर, येरवडा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. त्यावेळी पोलिस अंमलदार वामन सावंत आणि संजय बादरे यांना संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी यादव याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये केटीएम ड्यूक, यामाहा आर-15, यामाहा आरएक्स-100 च्या दोन दुचाकी, होंडा स्प्लेंडर प्लस आणि पॅशन प्लस यांचा समावेश आहे. या सहा वाहनांची अंदाजे किंमत 4 लाख 80 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे विश्रांतवाडी परिसरातील वाहनचोरीच्या काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. संशयिताने आणखी कोणत्या ठिकाणी वाहनचोरी केली आहे, तसेच या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत अन्य कोणी सहभागी आहे का, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ चार चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलिस आयुक्त येरवडा विभाग सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक सुनील उगले आणि तपास पथकातील पोलिस अंमलदारांनी ही कार्यवाही यशस्वी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *