![]()
माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या नावाखाली हॉटेल, रिसॉर्टमध्ये हजारो रुपये खर्च करतात. मात्र, या प्रथेला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत उमराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या २००८-०९ च्या इयत्ता दहावीच्या ५० माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सुमारे दीड
.
जिल्हा शिक्षण अधिकारी ओमप्रकाश पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निधी संकलित केला. त्यातून स्मार्ट टीव्ही, साऊंड सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अभ्यासक्रमाचे पेनड्राईव्ह आदी साहित्य शाळेला सुपूर्द करण्यात आले.
उमराणे जि. प. प्राथमिक शाळेत आयोजित ‘माजी विद्यार्थी स्नेहभेट व शैक्षणिक साहित्य वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान ए. एम. सोनवणे यांनी भूषविले. यावेळी माजी उपसभापती धर्माआण्णा देवरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
गेट-टुगेदरवर खर्च होणारा पैसा शाळेच्या प्रगतीसाठी वापरून या विद्यार्थ्यांनी संपूर्ण तालुक्यासमोर नवा आदर्श ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक संजय हिरे, छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. के. सूर्यवंशी, केंद्रप्रमुख पी. के. आहेर, यशोदा देवरे व सुनील देवरे यांनी मार्गदर्शन केले.
उमराणे जिल्हा परिषद शाळेला सोयी-सुविधा आणि निकालाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यात क्रमांक एकवर आणण्याचे आमचे स्वप्न आहे. हे स्वप्न केवळ एका बॅचचे नसून संपूर्ण गावचे आहे. त्यामुळे इतर सर्व माजी विद्यार्थ्यांच्या बॅचनेही पुढे येऊन आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे,असे माजी विद्यार्थी व पोलिस उपनिरीक्षक सुरज प्रविण देवरे यांनी सांगितले.