Headlines

चारित्र्य,आचरण चांगले नसेल तर अशा व्यक्तींच्या पाया पडण्याची गरजच नाही:समाधान महाराज यांचे प्रतिपादन; वैरागमध्ये संतनाथ महाराज यात्रेनिमित्त क्रीर्तन‎



माणसाची खरी ओळख ही त्याच्या पदाने, पैशाने अथवा प्रतिष्ठेने होत नसून त्याच्या चारित्र्याने आणि आचरणाने होत असते. ज्याचे चारित्र्य चांगले नाही, अशा व्यक्तीच्या पाया पडण्याचीही गरज नाही. चुकीच्या व्यक्तीला मोठेपणा देण्यापेक्षा सद्गुणी आणि चारित्र्यवान व

.

वैराग येथील ग्रामदैवत श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जीवनातील सुख-दुःख, मनोबळ, चांगले विचार, आईचे महत्त्व तसेच माणसाच्या आचरणाचे महत्त्व यावर प्रभावीपणे मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित भाविकांना अंतर्मुख केले.

‘कीर्तन ऐकावं म्हणणं कानाचं नाही, तर मनाचं असतं’ असे सांगत ह.भ.प. शर्मा महाराज म्हणाले की, एखादी गोष्ट करण्याचा निर्णय केवळ ऐकून किंवा इतरांच्या सांगण्यावरून होत नाही, तर मनाने ती गोष्ट स्वीकारली पाहिजे. मन जिथे सांगते, तेच आपण केले पाहिजे. मनाने एखादी गोष्ट ठरवली, तर ती पूर्ण करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. चांगले विचार मनात रुजले आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला, तर जीवनाला योग्य दिशा मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनावर चांगले संस्कार करण्याबरोबरच सकारात्मक विचारांची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले. सुख-दुःख हे जीवनाचे अविभाज्य चक्र जीवनामध्ये सुख आणि दुःखाचे चक्र सतत सुरू असते. दुःखानंतर येणारे सुख मनाला आनंद देऊन जाते. मात्र दुःखातूनच माणसाला जीवन जगण्याचे खरे बळ मिळते. संकटे आली म्हणून खचून न जाता त्यातून शिकत पुढे जाणे आवश्यक आहे. दुःख माणसाला कमजोर करण्यासाठी नसते, तर त्याला अधिक मजबूत बनविण्यासाठी येते, असा भावनिक या परखड आणि विचारप्रवर्तक कीर्तनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्मासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाला दिशा देणारे विचार मांडल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले. कीर्तनातून आईच्या त्यागाचे महत्त्व सांगताना शर्मा महाराज म्हणाले की, जगामध्ये आईपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. आई स्वतः कितीही दुःख सहन करेल; मात्र आपल्या लेकराला सुख मिळावे यासाठी ती आयुष्यभर प्रयत्नशील असते. आपल्या मुलांच्या सुखासाठी आई स्वतःच्या इच्छा, अपेक्षा आणि सुखाचा त्याग करते. त्यामुळे आईसारखे दुःख झेलणारे आणि लेकरासाठी त्याग करणारे जगात कोणीही नाही. आईच्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आई-वडिलांचा सन्मान करणे, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे आणि त्यांच्या संस्कारांचे पालन करणे हीच खरी मानवता आहे, असेही त्यांनी सांगितले.

जगामध्ये आईपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *