Headlines

एक वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 98 रुग्णांना वैद्यकीय मदत:संगमनेरातील रुग्णांना 1 कोटींचे अर्थसहाय्य- आ. खताळ‎




संगमनेर मतदारसंघातील सर्वसामान्य, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळवून देण्यात आमदार अमोल खताळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून मागील एका वर्षात ९८ रुग्णांना १ कोटींच्या आसपास वैद्यकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. खर्चिक आणि गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च पेलणे सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असते. अशा परिस्थितीत आमदार खताळ यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या या मदतीमुळे अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. यात कर्करोग शस्त्रक्रिया व केमोथेरपी/रेडिएशन, हृदयरोग आणि मेंदूचे गंभीर आजार, डायलिसिस व गुडघ्यांचे प्रत्यारोपण, नवजात शिशुंचे आजार आणि रस्ते अपघात, या व इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी हा निधी थेट रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती नसते, तर काहींना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात अडचणी येतात. हीच अडचण ओळखून आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होत असल्याने रुग्णांना अगदी वेळेत उपचार घेणे शक्य झाले आहे. याशिवाय उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाला त्रास सहन करावा लागू नये, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत आदी विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *