Headlines

‘ऑपरेशन टायगर’नंतर आता दुसरे ऑपरेशन:गोगावलेंचा गौप्यस्फोट, पुढच्या वेळेस सांगोल्याचा आमदार शिवसेनेचाच असेल‎




पुढे काय करायचे, याबाबतच्या सर्व गोष्टी आम्ही उघडपणे सांगू शकत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘ऑपरेशन टायगर’ करताना कधीही कोणाला सांगत नाहीत. अचानक एखादी घटना घडली की, ‘हे कसं काय झालं?’ असा प्रश्न सर्वांना पडतो. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार आमच्याकडे येऊ शकतात. आता दुसरेही एक ऑपरेशन होणार आहे, मात्र त्याबाबत आताच काही सांगणार नाही. आम्ही सांगितले तर माध्यमे त्याची बातमी करून टाकतील, असे वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले. ते शिवसेनेच्या वतीने सांगोल्यात शुक्रवारी (दि. ४) भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माढा लोकसभा संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, शिवसेना उपनेत्या दीपाली सय्यद, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना उपनेत्या दीपाली सय्यद , खासदार ज्योती वाघमारे, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘सब्र का फल मीठा होता है, भगवान के घर देर है, अंधेर नहीं.’ आम्हाला पावणेदोन वर्षे वाट पाहिली. सांगोल्याचा दुष्काळ संपवणारच : शहाजीबापू माजी आमदार शहाजी पाटील म्हणाले, सांगोला तालुका हा राज्यातील कमी पर्जन्यमानाचा व दुष्काळग्रस्त तालुका असून, येथे रोजगार हमी योजनेवर अवलंबून असणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. ‘सांगोला तालुक्याचा दुष्काळ संपवल्याशिवाय मी मरणार नाही,’ असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *