Headlines

'ऑपरेशन टायगर' सुरूच राहणार; उबाठाचे नेते स्वतःहून संपर्क साधतात:खासदारांच्या विलीनीकरणाचा निर्णय 100% कायदेशीर- योगेश कदम




ऑपरेशन टायगर कालही थांबलं नव्हतं आजही थांबलं नाही उद्याही थांबणार नाही. आम्ही स्वत:हून कोणालाही संपर्क करत नाही. उबाठाचे कार्यकर्ते, नेते, लोकप्रतिनिधी आम्हाला संपर्क करतात आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करायचे आहे असे सांगतात, शिवसेनेचे भवितव्य एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात दिसत आहे आम्हाला त्यांच्या नेतृत्चात काम करायचे आहे असे उबाठातील पदाधिकारी सांगत आहेत, असे मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. योगेश कदम म्हणाले की, संजय राऊत यांना माध्यमांसमोर शिव्या देण्याचे ज्ञान आहे कायद्याची समज नाही. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता त्यावेळीसुद्धा त्यांनी अनेक घोषणा केल्या. उद्धव ठाकरेंनी जवळच्या चार लोकांवरच ठेवलेला विश्वास त्यांना भोवला आहे. खासदारांच्या विलीनीकरणाचा निर्णय कायदेशीर आहे. FDA चे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार योगेश कदम म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची आम्हाला काही कल्पना नाही. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. पक्षांतर्गत जबाबदारी आणि ताकद एकनाथ शिंदे देतील ती आम्ही स्वीकारू. एफडीएच्या ज्या कारवाया होतात त्या अजून मोठ्या प्रमाणावर झाल्या पाहिजेत. आपण त्यासाठी केंद्र सरकारचा कायद्यानुसार काम करतो. यामध्ये बदल आपण केले पाहिजे असे आम्ही केंद्र सरकारला कळवले आहे. जो पर्यंत आपण कडक कायदा करत नाही तो पर्यंत या गुन्ह्यामध्ये जे लोकं सातत्याने सापडत आहेत त्यांना शिक्षा होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली आहे. कोणतीही आस्थपणा चालवत असताना एफडीएचे नियम जर धाब्यावर बसवत असाल तर त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. राजीनामा देऊन सुधारणा होत नाही योगेश कदम म्हणाले की, नीट पेपरफुटीचे कोणीही समर्थन केले नाही. ज्या लोकांचा यामध्ये सहभाग होता त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. ज्या व्यक्तीचा त्या प्रकरणाशी थेट संबंध नाही, मंत्री यात सहभागी असते तर त्यांचा राजीनामा मागणे योग्य होते. तरुणांचे जे नुकसान झाले ते पुन्हा होऊ नये यासाठी काम करणे गरजेचे आहे. वांगचुक हे चांगले समाजसेवक आहेत, त्यांनी सरकारला सूचना केल्या पाहिजेत की यामध्ये काय सुधारणा आणल्या जाव्यात. राजीनामा देणं म्हणजे काही सुधारणा नाही. पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्या लोकांना आपण अटक केली आहे. वांगचुक यांनी आम्हाला पुढे असे काही घडणार नाही यासाठी सूचना कराव्या आपण एकत्र येत काम करू.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *