Headlines

'चलो संसद' आंदोलनाला महाराष्ट्रातून पाठिंबा:जंतरमंतरवरील लाठीचार्जचा संताप; विद्यार्थ्यांसह विरोधी पक्ष रस्त्यावर, ठिकठिकाणी निदर्शने




राजधानी दिल्ली येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांमधून पाठिंबा दर्शवण्यात येत आहे. जंतर मंतर येथे सोनम वांगचुक तसेच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या ‘चलो संसद’ आंदोलनाला पाठिंबा म्हणून ठाण्यात सत्याग्रह केला जात आहे. ठाणे येथे सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत पथनाट्य सादर करत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. जंतर मंतर या ठिकाणी आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर विद्यार्थी तसेच इतर विरोधी पक्ष एकवटले असून त्यांनी सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोल्हापूर येथून देखील जंतर मंतर वरील आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. भाकप पक्षाकडून हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवला आहे. कोल्हापूरसह सोलापूर येथे देखील आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात देखील आझाद समाज पार्टीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *