![]()
डान्स बारविरोधी कायद्यातील अटींना बगल देत ऑर्केस्ट्रा परवान्यांचा गैरवापर करणाऱ्या बारचालकांना राज्य शासनाने दणका दिला आहे. गृह विभागाने २७ जुलै रोजी परिपत्रक काढून नवे ऑर्केस्ट्रा परवाने देण्यावर आणि जुन्यांच्या नूतनीकरणावर पूर्ण बंदी घातली आहे. नियम दोनदा मोडल्यास दंड व निलंबन, तर तिसऱ्यांदा परवाना कायमस्वरूपी रद्द होऊन फौजदारी गुन्हा दाखल होईल. ऑर्केस्ट्राच्या नावाखालील अश्लील नृत्ये रोखण्यासाठी अधिवेशनात विधेयक मंजूर झाले. न्यायालयात अंतिम निर्णय होईल राज्य सरकारने डान्स बार रोखण्यासाठी ५ वेळा कायद्यात दुरुस्ती केली, मात्र ती न्यायालयात टिकली नाही. त्यामुळे गृह विभागाच्या निर्णयालाही आव्हान दिले जाण्याची शक्यता असून तिथेच अंतिम निर्णय होईल. आधी काय होते? ऑर्केस्ट्रास महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३ अंतर्गत परवाने दिले जायचे. त्याचा फायदा घेऊन संगीतावर महिलांचे नृत्य सुरू होते. आता काय बदल झाला? ऑर्केस्ट्रा आस्थापनांनाही २०१६ च्या कायद्याच्या कक्षेत आणले. १९५१ च्या कायद्यानुसार मिळणारे नवे परवाने पूर्णपणे बंद करण्यात आले.
Source link
ऑर्केस्ट्राच्या परवान्याआडून चालणारी डान्स बारमधील छमछम आता बंद होणार:पावसाळी अधिवेशनात विधेयक मंजुरीनंतर गृह विभागाचा निर्णय