![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना’ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या पहिल्या सहा दिवसांत महसूल विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलत तब्बल ३,४३६ महिलांच्या नावे जमिनीची नोंद करून त्यांना ‘शेतकरी’ पदाचा अधिकृत दर्जा बहाल केला आहे. यामध्ये १,२१९ महिला शेतकऱ्यांची नोंद करत नागपूर विभागाने राज्यभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी महिलांना जमिनीचे हक्क देण्याच्या या कल्याणकारी निर्णयांतर्गत गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १,०६७ महिलांच्या नावे नोंदी करण्यात आल्या आहेत. याशिवाय गडचिरोलीमध्ये ७५, भंडारा येथे ३९ आणि चंद्रपूर येथे ३८ महिलांना शेतकरी दर्जा प्रदान करण्यात आला. सरकार लोकाभिमुख व वेगवान सेवा देण्यासाठी निरंतर कटिबद्ध छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महसूल विभाग अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि वेगवान सेवा देण्यासाठी निरंतर कटिबद्ध राहील. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री शेतरस्ते व जमिनींचे प्रश्न जागेवरच निकाली पाणंद रस्ते मोकळे मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’अंतर्गत अकोला जिल्ह्यात तब्बल २,७९७ रस्त्यांचे वाद मिटवून शेतरस्ते मोकळे करण्यात आले. स्वामित्व सनद व अतिक्रमण नियमिती नागपुरात ४२६ तर अमरावतीत ३६८ नागरिकांना ‘स्वामित्व सनद’ देण्यात आली. चंद्रपुरात ९,६१६ लाभार्थींना घरकुल योजनेचा थेट लाभ मिळाला. जिवंत सातबारा मोहीम साताऱ्यात २,७३३ आणि बुलढाण्यात १,४६० शेतकऱ्यांचे सातबारा अद्ययावतीकरणाचे प्रलंबित प्रश्न जागेवरच निकाली काढण्यात आले. ई-पीक पाहणी व फेरफार नोंदी ई-पीक पाहणीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची थेट नोंदणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे राज्यात अनेक महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. अधिकृत मालकी मिळून मालमत्ता कार्ड उपलब्ध होणार महिलांना शेतकरी दर्जा मिळाल्याने आता त्यांना बँकांचे कृषी कर्ज, शासकीय नुकसानभरपाई आणि थेट अनुदानाचा स्वतंत्र कायदेशीर हक्क मिळणार आहे. तर “स्वामित्व सनद’ मुळे ग्रामीण भागातील गावठाण जमिनीची अधिकृत मालकी मिळून मालमत्ता कार्ड उपलब्ध होत आहे. जनसेवेचा नवा विक्रम – ६ दिवसांत ४.३५ लाख लाभार्थी २२ जुलैपासून सुरू झालेल्या या शिबिरांमध्ये राज्यातील ४ लाख ३५ हजार २०९ नागरिकांनी १५ विविध महसुली सेवांचा थेट लाभ घेतला. पुणे विभागात सर्वाधिक ६६,२०० तर जिल्ह्यात बुलढाणा (१५,८४३), कोल्हापूर (१४,२८९), सातारा (१४,१८९), चंद्रपूर (१२,७०१) व अमरावती (१२,०५७) या जिल्ह्यांनी अव्वल कामगिरी केली आहे.
Source link
महाराजस्व अभियान:सहा दिवसांत 3,436 महिलांना मिळाला शेतकऱ्याचा दर्जा, नागपूर विभाग राज्यभरात अव्वल