![]()
ओप्पो इंडियाने प्रीमियम स्मार्टफोन श्रेणीत नवीन फाइंड एक्स १० सिरीज सादर केली आहे. यामध्ये ओप्पो फाइंड एक्स १० आणि फाइंड एक्स १० प्रो मॅक्स या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. या सिरीजची सुरुवातीची किंमत १ लाख ३९ हजार ९९९ रुपये आहे. हॅसलब्लॅडच्या सहकार्याने विकसित केलेली कॅमेरा प्रणाली, मोठी बॅटरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सुविधांवर कंपनीने भर दिला आहे अशी माहिती प्रोडक्ट मॅनेजर अपूर्वा श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ट्रिपल २०० मेगापिक्सेल कॅमेरा फाइंड एक्स १० मध्ये ड्युअल २०० मेगापिक्सेल कॅमेरा प्रणाली, तर प्रो मॅक्समध्ये मागील बाजूला तीन २०० मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. यामुळे फोटोतील रंग, बारीक तपशील आणि प्रकाशातील फरक अधिक स्पष्टपणे टिपण्याचा दावा कंपनीने केला आहे. व्हिडिओसाठी ४ के आणि ८ के रेकॉर्डिंगसह डॉल्बी व्हिजनची सुविधाही देण्यात आली आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ८,००० एमएएचपर्यंतची बॅटरी असून, ८० वॅट वायर्ड आणि ५० वॅट वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे. प्रो मॅक्समध्ये दोन नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी ९६०० प्रो प्रोसेसर देण्यात आला आहे. नव्या कलरओएस १७ मध्ये एआयच्या मदतीने फोटो संपादन, माहिती शोधणे आणि विविध कामे सुलभ करणारी वैशिष्ट्ये आहेत. टॅबलेट आणि इअरबड्सही सादर कंपनीने ८.८ इंचांचा ओप्पो पॅड मिनी टॅबलेट, डाइनऑडिओच्या सहकार्याने विकसित केलेले एन्को एक्स ४ इअरबड्स आणि १०,००० एमएएच क्षमतेची पॉवर बँकही सादर केली आहे. फाइंड एक्स १० (१२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज) ची किंमत १,३९,९९९ रुपये, तर ५१२ जीबी मॉडेलची किंमत १,६९,९९९ रुपये आहे. फाइंड एक्स १० प्रो मॅक्सची किंमत १,९९,९९९ रुपये आहे. पॅड मिनीची किंमत ९४,९९९ रुपये, एन्को एक्स ४ ची १९,९९९ रुपये, तर पॉवर बँकेची किंमत २,१९९ रुपये आहे. खरेदीवर अटींनुसार कॅशबॅक, एक्सचेंज आणि हप्त्यांचे पर्याय उपलब्ध असतील.
Source link
ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीज सादर, किंमत 1.39 लाखांपासून:हॅसलब्लॅडच्या सहकार्याने ट्रिपल 200 मेगापिक्सेल कॅमेरा, पॅड मिनी, एन्को एक्स 4 आणि पॉवर बँकही लॉन्च