Headlines

कन्नडमध्ये १२७०० क्विंटल मका खरेदी:२ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना पैसे हस्तांतर




प्रतिनिधी |कन्नड शासकीय हमी भावाने कन्नड तालुक्यात खरेदी करण्यात येत असलेल्या मका खरेदीची मुदत ३० एप्रिलला संपुष्टात आली. आजपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर १२७०० क्विंटल मका खरेदी करण्यात आली, अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नीलेश राठोड यांनी दिली. तहसील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राठोड यांनी सांगितले की, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शासकीय हमी भावाने कन्नड तालुक्यामध्ये मका खरेदी करण्यात आली आहे. ३० एप्रिलला अंतिम मुदत होती ती संपुष्टात आल्याने आता मका खरेदी थांबवण्यात आली आहे. आजपर्यंत १२७०० क्विंटल मका हमी भावाने खरेदी करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने प्रतिक्विंटल २४०० रुपये भाव निर्धारित करण्यात आलेला होता. मार्चपर्यंत कन्नड तालुक्यात २ कोटी ६९ लाख रुपये एवढा निधी कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आला आहे. खरेदी केलेला मका सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत कन्नड, पिशोर आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय गोदामात साठवण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *