Headlines

अंगणवाडी सेविका, मदतनिसांची दिवाळी गोड:भाऊबीज भेट मिळणार 2 हजार रुपये, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 1,08,627 सेविका




यंदा राज्यात दुष्काळाचे सावट असले आणि शेतकरी हवालदिल झालेला असताना राज्य सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविका व मदतनिसांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सध्या १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. अशा एकूण २,१४,०९७ पदांवर काम करणाऱ्या महिलांना या भाऊबीज भेटीचा लाभ मिळणार आहे. यासाठी शासनाकडून तब्बल ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची अहोरात्र काळजी घेणाऱ्या या महिलांची दिवाळी गोड व्हावी हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदाराच्या मानधनामध्ये वाढ राज्यातील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदार यांच्या मानधनात वाढ करण्यास शासनाने मान्यता दिली असून तसा शासन निर्णय आदेश बुधवारी (१४ ऑक्टोबर) जारी करण्यात आला. राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदानित वसतिगृहे चालवली जातात. या वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांचे मानधन अत्यंत कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी विविध लोकप्रतिनिधी, कर्मचारी संघटना आणि संस्थांकडून सातत्याने केली जात होती. यासाठी आंदोलने आणि उपोषणेही करण्यात आली होती. अखेर राज्य शासनाने या मागणीची दखल घेत मानधनवाढीचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. लाडक्या बहिणींना अद्याप दोन महिन्यांची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा दीड हजार रुपये लाभ सप्टेंबर महिन्यात देण्यात आला होता. मात्र ऑक्टोबर महिन्याचे १४ दिवस उलटूनही अजून सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळालेला नाही. दसरा आणि दिवाळी सण तोंडावर आला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकत्रित मिळावेत अशी मागणी महिलांमधून व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *