![]()
भिवधानोरा येथील विद्यार्थ्यांचा तराफ्यावरून चाललेला जीवघेणा प्रवास आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली आहे. सरकार व प्रशासनाला १५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर किंवा शपथपत्र दाखल करण्याचा अल्टिमेटम दिला असून मुदतीत उत्तर न आल्यास ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांना ऑनलाइन उपस्थित राहण्याची ताकीद दिली आहे. मुले तराफ्यावरून जायकवाडीचे बॅकवाटर पार करून शाळेत जातात. यावर ‘दैनिक दिव्य मराठी’ने १७ सप्टेंबर २०२२ रोजी वृत्त प्रकाशित करून वाचा फोडली. या ची दखल घेत तत्कालीन न्या. रवींद्र घुगे, न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी याचिका दाखल करून घेतली होती . दैनिक दिव्य मराठीमध्ये १७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रकाशित वृत्त. पर्यायी उपाययोजना नाही न्यायालयाने ११ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा प्रशासनाला १२ तासांत सुसज्ज बोट आणि नावाड्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तीन वर्षे उलटूनही उपाययोजना झाली नाही. खंडपीठाने या वर संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी ॲड. पुष्कर एस. शेंदुर्णीकर यांची नियुक्ती केली होती.
Source link
दिव्य मराठी इम्पॅक्ट:विद्यार्थ्यांचा तराफ्यावरून प्रवास; उच्च न्यायालयाचा राज्य शासनास अल्टीमेटम, 15 ऑक्टोबरपर्यंत शपथपत्र देण्याचे आदेश