![]()
भारतीय संस्कृतीत प्रत्येक स्त्रीमध्ये देवत्व असल्याची धारणा आहे. शारदीय नवरात्र महोत्सव हा खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा उत्सव असतो, असे प्रतिपादन भाजप वैद्यकीय सेलचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिलीपसिंग राजपूत यांनी केले. श्रीक्षेत्र कालिमठ (उपळा) येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित महापूजेत व महाआरतीप्रसंगी ते बोलत होते. तालुक्यातील श्रीक्षेत्र कालिमठ येथे नवरात्रोत्सवानिमित्त कालिका माता मंदिरात घटस्थापना करून सप्तशतीचे पाठ आयोजित करण्यात आले आहेत. याप्रसंगी बोलताना डॉ. राजपूत म्हणाले की, स्त्रीमधील मातृदेवतेची जाणीव प्रत्येक कुटुंबात झाली, तर समाजात कोणतेच प्रश्न शिल्लक राहणार नाहीत. स्त्री ही अबला नसून ती दुर्जनांचे निर्दालन करणारी शक्ती आहे, याची अनुभूती या महोत्सवातून मिळते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत, राजकुमार भारुका, खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने, मुख्याध्यापक एच. बी. पाटील आणि कृषीभूषण डॉ. सिताराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कालिमठ ट्रस्टच्या अध्यक्षा सुचित्रा शिवाजी सोनवणे यांनी सांगितले की, महोत्सवामध्ये दररोज सकाळी ६ वाजता आरती, १० वाजता गणपती व कालिका मातेस पंचामृत षोडशोपचार अभिषेक, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. तसेच नवचंडी हवनाचा भाविक लाभ घेत आहेत. हवनाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न अविनाश राजाराम जोशी, राहुल अनिल जोशी, विजय कापसे गुरुजी, राहुल विजय जोशी व सोनू कांता जोशी करत आहेत.
या प्रसंगी स्मिता पाटील, माधुरी मोतीयेळे, रूपाली मेहराळ, शोभा जोशी, मंगल गीते, अर्चना पाटील, संगीता काचोळे, आशाबाई चव्हाण, शोभा चोबे, जगत प्रसाद चोबे, सदानंद राठोड व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
शारदीय नवरात्र महोत्सव हा खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा उत्सव- डॉ.दिलीपसिंग राजपूत:श्रीक्षेत्र कालिमठ उपळा येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महापूजा उत्साहात