![]()
श्री रेणुका देवीच्या पावन पदस्पर्शाने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चांदवड शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. शहरातील महालक्ष्मी माता, सप्तशृंगी माता, कच्छ देवी, तुळजाभवानी आणि होळकरकालीन कालिका देवी मंदिरांत घटस्थापना, महाआरती, पूजा, अभिषेक आणि
.
गुजराथ गल्लीतील दसा श्रीमाली गुजराथी पंच ट्रस्टचे हे १९ व्या शतकातील मंदिर आहे. १९९९ मध्ये आणि एप्रिल २०१९ मध्ये त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. तीन मजली मंदिरात महालक्ष्मी मातेची आकर्षक मूर्ती आहे. समाजातर्फे दररोज महाआरती व गरबा, नवमीला होमहवन आणि विजयादशमीला विविध उपक्रम होतात.
म्हसोबा चौकी व वाकसीळी चौकीजवळील म्हसोबा मंदिराशेजारी सुमारे ५-७ वर्षांपूर्वी हे मंदिर उभारण्यात आले. चैत्र पौर्णिमा व नवरात्रोत्सवात येथे यात्रा भरते. अष्टमीला पारंपरिक घागरी फुंकणे आणि राहाडीचा कार्यक्रम होतो. म्हसोबा मंदिराचा जीर्णोद्धार व सभामंडपाचे काम नुकतेच झाले आहे.
गुजराथ गल्लीतील या मंदिरात दहा दिवस गरबा, दांडिया, स्पर्धा, महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. गल्लीमध्ये विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. सोनुपंत ठाकरे यांच्या मंदिरात दररोज आरती, गरबा, दांडिया, घागरी फुंकणे, होमहवन आणि विजयादशमीला महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सोनुपंत ठाकरे, सूर्यकांत ठाकरे, उमाकांत ठाकरे, जयवंत ठाकरे व ठाकरे परिवाराने भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. चांदवड डोंगरात जमिनीपासून २५० फूट उंचीवर असलेल्या होळकरकालीन गुहेतील मंदिरात महाआरती, पूजा, अभिषेक व घटस्थापना होते. चाळीसगावचे डॉ. यशवंत देशपांडे यांनी काही वर्षांपूर्वी पायऱ्या बांधल्या. येथे भगवान चंद्रप्रभूंची भव्य मूर्ती, २४ तीर्थंकर, शीतलामाता व नरोटीमाता यांच्या मूर्ती आहेत. दोन वर्षांपूर्वी देवीचा पुनर्प्रतिष्ठा सोहळा झाला. मंदिराजवळ कोरीव पाण्याचे टाके असून, कोजागरी पौर्णिमेला गोसावी बंधूंमध्ये पाळी ठरविली जाते.