![]()
राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी आज (22 जुलै) जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. या कर्जमाफीच्या यादीत फक्त 553 शेतकऱ्यांचेच नाव असल्याचे समोर आले आहे. बाबासाहेब पाटील म्हणाले, ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम करण्यासाठी सरकारचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एवढी मोठी कर्जमाफी कधीच झाली नव्हती. अतिशय पारदर्शक पद्धतीने हे काम करण्यात येत आहे. पुढे बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले, महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना सुरुवातीला आपण 50 हजार रुपये देण्याचे ठरवले होते. पण पुन्हा विचार करून त्यांना 2 लाख देण्याचे निश्चित केले आहे. त्याची एकूण 4 हजार 395 कोटी रुपये रकम झाली. आणि वरचे जे आहेत 36 हजार 585 आणि दोन्हीची बेरीज करून एकूण रकम झाली 40 हजार 980 कोटी. पहिल्या यादीत 553 शेतकऱ्यांना लाभ आज ठरल्याप्रमाणे जे इन्कम टॅक्समध्ये जे बसत नाहीत त्यात अमरावतीमध्ये डीसीसी बँक 58, लातूर डीसीसी बँक 133, नागपूर 16, पुणे 85, सातारा 38 आणि ठाणे 182 अशी एकूण 553 सदस्य झाले आहेत आणि अमाऊंट 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 झाली आहे. बाकीचे काम देखील सातत्याने सुरूच आहे. यात विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच आमच्या खात्याचे प्रधान सचिव, सहकार आयुक्त व सर्व अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम केले आहे, अशी माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. बाबासाहेब पाटील म्हणाले की, इन्कम टॅक्सची यादी अद्याप आली नसल्याने सध्या एवढ्या शेतकऱ्यांची नावे समोर आली आहेत. परंतु, याद्यांचे काम सुरू आहे. आम्ही पूर्णच करायचे ठरवले होते, पण दिल्लीकडून जी माहिती यायला पाहिजे होती ती आली नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागत आहे. आता आकडेवारी तर आम्ही जाहीर केली आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
Source link
कर्जमाफीची फक्त 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर:तांत्रिक अडचणींमुळे उशीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची पत्रकार परिषद