![]()
यश मिळवणे म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला ओझे न समजता सातत्य ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून स्वतःला सिद्ध करणे, हीच खरी गुणवत्ता आहे, असे प्रतिपादन जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांनी केले. येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता १० वी) आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९०.८३ टक्के लागला असून, या निमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी व पालक सत्कार समारंभात जाधव बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक रवींद्र पाटील, जगन्नाथ जाधव, गणेश डव्हारे, प्रदीप सनंसे, सुधाकर निळ, देविदास चौधरी आदींची उपस्थिती होती. विद्यालयातून या परीक्षेसाठी एकूण २४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २१८ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. प्रथम श्रेणीत ७८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ७५, पास श्रेणीत २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यालयाच्या वतीने पहिल्या १० ते १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदीप सनंसे यांनी केले. या सोहळ्याला विद्यार्थी आणि पालकांची मोठी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेताना जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालावी, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच पालकांनीही मनोगत व्यक्त करीत शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतूक करीत आभार मानले. यामध्ये साक्षी विजय राठोड ९०.८०% प्रथम, गौरी नंदकुमार अकोलकर ९०.४०% द्वितीय, प्रीती भाऊसाहेब पगारे ९०.२०% तृतीय तर अर्शीन फईम शेख ८८%, भाग्येश अंकुश पवार ८६.६०%, आरती संतोष बैनाडे ८५.२०%, अनिकेत किशोर अकोलकर ८४.८०%, कार्तिकी गणेश घुले ८४.२०%, सृष्टी अर्जुन जाधव ८४%, यशवंत संजयकुमार काळे ८३.८०%, कार्तिक बाळू गायकवाड ८३.४०%, प्रज्ञा संतोष मुठे हिने ८२.६०% गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील पाटील, आनंद बागुल, परदेशी, बाबुराव खरे, सचिन चव्हाण, सौरभ हिरे आदींनी परिश्रम घेतले. यशाचे गमक असलेल्या पालकांचाही शाळेच्या वतीने करण्यात आला सन्मान केवळ विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक न करता, त्यांच्या यशामागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचाही विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. “विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळा आणि शिक्षक यांच्याइतकाच वाटा पालकांचा असतो, म्हणूनच हा गौरव पालकांचाही आहे, असे मत मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. ग्रामीण भागातील मुलांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Source link
कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात रंगला सत्कार सोहळा:विद्यार्थ्यांनी स्वतःला पैलू पाडत सिद्ध करणे हीच खरी गुणवत्ता- सागर जाधव