Headlines

कारच्या धडकेत गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू:दुसऱ्या तरुणाची मृत्यूशी झुंज, शनिवारी घडला होता अपघात‎




भरधाव कारने इलेक्ट्रिक स्कूटीला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोन चुलत भावांपैकी रोहित भगवान डकले (१९) याचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा चुलत भाऊ निखिल पांडुरंग डकले याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तो सध्या खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. रोहितवर सोमवारी सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात गेवराई गुंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास आळंद येथे हा भीषण अपघात घडला होता. रोहित डकले व निखिल डकले हे दोघे चुलत भाऊ आपल्या इलेक्ट्रिक स्कूटीने आळंदच्या दिशेने जात होते. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने (एमएच ०३ डीजी ३३२६) त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारने स्कूटीला सुमारे शंभर फुटांपर्यंत फरफटत नेले. या अपघातात दोघेही तरुण गंभीर जखमी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *