Headlines

कुंडली दोषाच्या नावाखाली 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार:लातूरमध्ये बोगस महाराजाला अटक, पीडिता तीन महिन्यांची गर्भवती




तुझ्या पत्रिकेत कुंडली दोष आहे, तो दूर ‎‎करायचा असेल तर एक पूजा घालावी‎ लागेल, असे सांगत भोंदू बाबाने 17 वर्षांच्या ‎‎तरुणीवर आपल्याच घरात अत्याचार केला. ‎‎‎त्यामुळे पीडीता 3 ‎‎‎महिन्यांची गर्भवती ‎‎‎राहिल्यानंतर पीडीतेच्या ‎‎‎तक्रारीवरून ‎‎भोंदूविरोधात पोक्सो‎‎ आणि अंधश्रद्धा निर्मूलन ‎‎‎कायद्यानुसार लातुरातील ‎‎‎विवेकानंद चौक‎‎ पोलिसांत गुन्हा दाखल ‎‎झाला. रामेश्वर हणमंतराव रामदासी (40) ‎‎असे अटकेतील भोंदूचे नाव आहे.‎ लातुरातील मुलीचे लग्न जुळत‎ नसल्यामुळे तिचे आई वडिल चिंताग्रस्त ‎होते. परिचयातील काही लोकांनी रामेश्वर रामदासी हा महाराज यावर मार्ग काढतो ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अशी माहिती त्यांना दिली. त्यामुळे पीडीत‎ मुलीचे पालक त्याच्याकडे गेले असता त्याने ‎मुलीची पत्रिका पाहिली. तिच्या पत्रिकेत कुंडली दोष आहे, यासाठी पुजा घालावी‎ लागेल असे सांगीतले. त्यामुळे जून 2026 ‎मध्ये भोंदू तिच्या घरी गेला. भोंदूने वरच्या ‎मजल्यावरील खोलीत पुजा मांडली. तर ‎मुलीच्या आई वडिलांना दुसऱ्या खोलीत‎ बसवले. नंतर खोलीचा दरवाजा ‎लावल्यानंतर भोंदूने पीडीत मुलीला कुंडली ‎दोष काढायचा असेल तर माझ्याशी‎ शारिरिक संबंध ठेवावे लागतील, ही बाब ‎कोणाला कळाली तर कुंडली दोष निघणार ‎नाही असे सांगत तिच्यावर अत्याचार केला.‎ पीडीता 3 ‎महिन्यांची गर्भवती या घटनेला 3 महिने उलटल्यानंतर पीडीता 3 ‎महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.‎ त्यामुळे भोंदूविरोधात गुरनं 681/26 कलम ‎64(2)(एम) बीएनएस, सह कलम ‎4,6,8,12 पोस्को, सहकलम 3(2)‎अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा‎ दाखल झाला. पीडीता 3 महिन्यांची गर्भवती‎ आहे. त्यामुळे आरोपीची आणि गर्भाची ‎डिएनए चाचणी करण्यात येणार आहे.‎भोंदूला न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस‎ कोठडी सुनावली,असे पोलिस निरीक्षक‎ अरविंद पवार यांनी सांगितले.‎ भोंदू दहावी पास, पीडितेचे ‎आई-वडील कष्टकरी‎ या घटनेतील भोंदू महाराज विवाहीत असून‎ तो केवळ दहावी पास आहे. पूजा अर्चा करुन‎ कुंडली पाहण्याचे आणि दोष दूर करण्याचे तो‎ दावे करतो. पीडीत मुलीचे पालक कष्ट करुन‎ उपजीविका भागवतात तर पीडिता‎ अकरावीच्या वर्गात आहे. कुंडलीत दोष ‎असल्याचे दावे करुन त्याने या कुटुंबाला त्याने ‎गळाला लावले, त्यांच्याकडून पैसेही उकळले‎ आणि मुलीवर अत्याचार केला.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *