![]()
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी येण्याचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात आले. यावेळी समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य उपस्थित होते. यावर्षी कार्तिकी यात्रा शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० मिनिटांनी उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी (दि. ४) मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), सदस्या व नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके, शकुंतला नडगिरे, अॅड. माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, आदी यावेळी उपस्थित होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वीणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मानित केले.
Source link
कार्तिकी यात्रेच्या महापूजेचे उपमुख्यमंत्री शिंदेंना निमंत्रण:सहअध्यक्ष औसेकर महाराज, नगराध्यक्ष भालकेंची उपस्थिती