![]()
सिल्लोड तालुक्यातील कासोद येथे १ लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभासह पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार सत्तार यांनी जलकुंभ व पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करून ही सुविधा ग्रामस्थांच्या सेवेत अर्पण केली. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या आठवड्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात बैठक घेतली होती. या बैठकीत जलजीवन मिशन (वॉटर ग्रिड) अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कासोद येथील जलकुंभ व पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित काम पूर्ण करून ही योजना आज ग्रामस्थांच्या सेवेत दाखल करण्यात आली. गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाढे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, गणेश ढोरमारे, रवी काळे, शिवा गौर, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आप्पासाहेब काटकर, गजानन महाजन, पप्पू जगनाडे, राहुल महाजन, सरपंच दत्तू राकडे, उपसरपंच राहुल राकडे यांच्यासह ग्रा.स. संजय राकडे,अभिषेक राकडे, अण्णासाहेब राकडे, सागर शेळके, बंडू निकम, गणपत निकम, संजू काचोळे, गणी पठाण, निलेश राकडे, दौलत राकडे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
कासोदला जलकुंभासह पाणीपुरवठा योजनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण