Headlines

'काही क्षण शब्दात व्यक्त करता येत नाहीत':देवीची आरती करताना अभिषेक घोसाळकरांचा AI व्हिडीओ पाहून तेजस्वी घोसाळकर भावुक




घटस्थापनेनंतर सोमवारपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सार्वजनिक देवींचे आगमन झाले असून, भाविकांकडून देवीचे दर्शन घेतले जात आहे. याचदरम्यान, नवागावची आई माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी मंडळाच्या देवीच्या आगमन सोहळ्याला उपस्थित राहून मनोभावे आरती केली आणि आई माऊलीचे दर्शन घेतले. यावेळी घडलेल्या एका भावनिक प्रसंगाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तेजस्वी घोसाळकर आपल्या कुटुंबीयांसह देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी नवागावची आई माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने अभिषेक घोसाळकर यांचा एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारलेला प्रतीकात्मक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये अभिषेक घोसाळकर देवीची आरती करताना दिसत होते. हा व्हिडीओ पाहून तेजस्वी घोसाळकर भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हा प्रसंग पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. ‘काक्षण शब्दांत व्यक्त करता येत नाहीत’ या भावनिक प्रसंगाबाबत तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावूक होता. अभिषेक दादांच्या आठवणींना उजाळा देणारा हा अनुभव मनाला स्पर्शून गेला. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी, त्यांचं प्रेम आणि त्यांनी दिलेला सहवास कायम माझ्या मनात जिवंत राहील. काही क्षण शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, ते फक्त मनापासून अनुभवता येतात. आजचा हा क्षणही असाच होता.” दरम्यान, अभिषेक घोसाळकर हे तेजस्वी घोसाळकर यांचे पती होते. 2024 मध्ये मुंबईतील दहिसर परिसरात एका वादातून त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे घोसाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, त्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी खंबीरपणे उभे राहत पतीचा राजकीय वारसा पुढे नेला. ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी राजकारणात सक्रिय राहत आपली वाटचाल सुरू ठेवली. त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2025 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यामुळे देवीच्या आरतीदरम्यान पतीचा एआय व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *