![]()
दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील ‘नेव्हीनगर’ परिसरात एका नौदल जवानासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात चौघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी व दोन निष्पाप बालकांना विष देऊन कर्मचाऱ्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. १५ ऑगस्टच्या रात्री ही घटना समोर आली असून कफ परेड पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केली. पुरणमल शंभूलाल मेहरा (३०) असे मृत नौदल जवानाचे नाव असून त्यांच्यासह पत्नी ओमा (२८), मुलगा यश (३) आणि अवघ्या दोन महिन्यांची चिमुकली मुलगी मृतावस्थेत आढळली. पुरणमल यांचा मृतदेह छताला लटकलेल्या स्थितीत होता, तर पत्नी आणि दोन्ही मुले पलंगावर निपचित पडलेली होती. घटनास्थळावरून सुसाइड नोट मिळालेली नाही. पत्नी, मुलांना जेवणातून विष दिल्याचा संशय प्राथमिक तपासानुसार, कौटुंबिक किंवा मानसिक तणावातून पुरणमल यांनी प्रथम जेवणातून किंवा दुधातून पत्नी व दोन्ही मुलांना विष दिले असावे आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून जीवन संपवले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी सर जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले असून व्हिसेरा व फॉरेन्सिक तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. कफ परेड पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर भारतीय नौदलाने अधिकृत निवेदन जारी करत तपासात पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, पुरणमल मेहरा यांच्यावर नेमका कसला मानसिक अथवा आर्थिक ताण होता का, हे जाणून घेण्यासाठी सहकारी, शेजारी आणि नातेवाइकांचे जबाब नोंदवले जात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी दिली. मृतदेह जे. जे. रुगणालयात पाठवले पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Source link
कुटुंबच संपले:मुंबईत पत्नी, 2 मुलांना संपवून नौदल जवानाने केली आत्महत्या, घटनेनंतर भारतीय नौदलाने केले अधिकृत निवेदन जारी