Headlines

धक्कादायक:सावखेडा येथील जायकवाडी बॅकवॉटरमध्ये ‎उतरलेल्या दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू‎, विविध संघटनांचा ठिय्या‎




तालुक्यातील सावखेडा येथे‎गोदावरी नदीच्या जायकवाडी ‎‎बॅकवॉटरच्या पाण्यात‎मासेमारीसाठी उतरलेल्या दोन ‎‎सख्ख्या भावांचा पाण्यात‎उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा‎धक्का बसल्याने मृत्यू झाला.‎ यासंदर्भात मिळालेल्या‎माहितीनुसार, सावखेडा येथील‎कैलास नंदू पवार (३४) व‎ज्ञानेश्वर नंदू पवार (२८) हे दोघे‎रविवारी सकाळी साडेदहा‎वाजेच्या सुमारास महानुभाव‎आश्रमाजवळील गोदावरी नदीच्या‎ जायकवाडी बॅकवॉटरच्या पाण्यात‎मासेमारीचे जाळे काढण्यासाठी‎उतरले होते. त्या वेळी त्यांना‎अचानक विजेचा जोरदार धक्का‎बसला. उपस्थित नागरिकांनी त्यांना‎तात्काळ गंगापूर येथील उपजिल्हा‎रुग्णालयात उपचारासाठी दाखल‎केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी‎तपासून त्यांना मृत घोषित केले. मृत‎कैलास पवार यांच्या पश्चात आई,‎पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा‎परिवार आहे. मृत ज्ञानेश्वर पवार‎यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले‎असा परिवार आहे.‎ विविध संघटनांचा ठिय्या‎ सावखेडा येथे दोघांचा जीव गेल्याने‎संताप व्यक्त होत होता. विविध‎संघटनांनी एकत्र येत पोलिस‎ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.‎संघटनांच्या दबावानंतर अखेर‎पोलिसांनी महावितरण कर्मचाऱ्यांवर‎गुन्हा दाखल केला.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *