![]()
प्रतिनिधी | अमरावती महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि. अमरावती, शेगाव – रहाटगाव रोड, अमरावती येथे नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री (रस्ते वाहतूक व महामार्ग), भारत सरकार यांनी सदिच्छा भेट दिली. दरम्यान त्यांनी बँकेच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. त्यांनी प्रशंसा केली. यावेळी त्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वर्गीय विनायकराव उर्फ दादासाहेब कोरडे यांच्या प्रतिमेलाही हारार्पण करण्यात आले. यानिमित्ताने बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, उपाध्यक्ष प्रमोद कोरडे व संचालक राजेंद्र आंडे यांनी नितीन गडकरी यांचे स्वागत केले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. बँकेची स्मरणिकाही भेट दिली. यावेळी अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आ. प्रवीण तायडे, माजी आ. प्रवीण पोटे व बँकेचे संचालक वामन वासनकर, डॉ. अशोक लांडे, रमेश मडघे, संजय कुरळकर, मनोज भेले, डॉ. सुधाकर डेहनकर, बाळासाहेब अलोणे, प्रा. हेमंत बेलोकर, सुदेश भेले, दिपक लोखंडे, श्रीकांत आपले, यशवंत गोंडेकर, राजश्री जढाळे, निलिमा अडोकर, विठ्ठल बकाले, अॅड. आशिष लांडे, नगरसेविका कल्याणी आकाश तायडे, वैशाली सिनकर, उद्योजक कपिल आंडे, सचिन वानखडे, सागर आंडे, श्रीनिवास लोखंडे, सुहास गोंगे, बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र भेले, सर्व शाखा व्यवस्थापक व समस्त कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेच्या तज्ञ संचालक अॅड. आशिष लांडे यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सिनकर यांनी केले.
Source link
केंद्रीय मंत्री गडकरी यांची महात्मा फुले अर्बन बँकेला सदिच्छा भेट:कर्मचारी, सभासद, ग्राहक, हितचिंतकांनी केले बँकेला सहकार्य