Headlines

केतन अग्रवाल खून:दोन जणांनी थांबवले, तरीही सिया अन् चेतनने केतनच्या हत्येचा कट पुढे नेला




केतन अग्रवाल याचा खून करण्याचा कट किती आधीपासून शिजत होता? आरोपींना खून करायचा होता की आधी केतनला कायमचे अपंग करण्याचा प्रयत्न होता? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कटाची माहिती तीन आरोपींशिवाय अन्य दोघांनाही होती का? पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या सुमारे पाच हजार पानांच्या दोषारोपपत्रातील तपशिलातून या प्रश्नांची उत्तरे समोर येत आहेत. कटाची माहिती मिळालेल्या दोघांनी ‘असे काही करू नका’ असा स्पष्ट सल्ला दिला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आरोपींनी पुढे कट रेटल्याचा पोलिसांचा दावा आहे. 18 जूनला केला केतनचा खून पूर्वतयारी, संपर्क आणि विविध पर्यायांवर चर्चा झाल्यानंतर 18 जून रोजी केतनचा लोहगड परिसरात मृत्यू झाला. सुरुवातीला तो दरीत पडल्याची शक्यता व्यक्त झाली होती. मात्र, पुढील तपासात ही घटना नियोजित खून असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला. सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांचा कटातील सक्रिय सहभाग असल्याचे सांगत पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आधी केतनला अपंग करण्याचा विचार तपासातील आणखी एक महत्त्वाचा धागा रितेशच्या हालचालींशी संबंधित आहे. केतनचे हात-पाय मोडून त्याला कायमचे अपंग करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला सुपारी देता येईल का? याबाबत रितेशने प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. चेतन रितेशला उधारीवर पैसे द्यायचा चेतन काही वेळा रितेशला उधारीवर पैसे द्यायचा. त्यामुळे निर्माण झालेल्या जवळच्या मैत्रीपोटी रितेशने कोणताही ठोस आर्थिक लाभ नसतानाही सिया आणि चेतनला मदत केल्याचा पोलिसांचा दावा आहे. सियाने खुनाबाबत एकास दिली माहिती सियाने केतनचा खून करण्याची माहिती तिच्या जवळच्या व्यक्तीला दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. संबंधित व्यक्तीने तिला थेट या प्रकारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ‘तुझे आणि चेतनचे संबंध कुटुंबीयांना सांगतो. तुमच्या लग्नाबाबत बोलतो; पण असे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करू नका,’ असे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. एका बाजूला रितेशच्या मित्राने संभाव्य मदतीला नकार दिला, तर दुसऱ्या बाजूला सियाच्या परिचिताने लग्नाचा पर्याय सुचवत गुन्ह्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. रितेश हंगे होता सियाच्या संपर्कात पोलिसांच्या तपासानुसार, चेतन चौधरी आणि रितेश हंगे हे जवळचे मित्र होते. केतनचा खून करण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर रितेश सियाच्या संपर्कात होता. केतनविरोधात काय करायचे, त्यासाठी कुणाची मदत घेता येईल याबाबत तो माहिती घेत होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *