Headlines

खड्ड्यातील पाण्यामध्ये बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू:हनुमानढाणा येथे कंत्राटदारावर कारवाईची मागणी‎




चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हनुमानढाणा येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून नायरा संजू भुसुम या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी २९ जुलैला घडली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हनुमानढाणा गावात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहे. सद्या सतत पाऊस सुरू असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दरम्यान खेळता खेळता चिमुकली नायरा घराशेजारील साचलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ गेली आणि त्यात पडली. मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी शोध घेतला असता ती खड्ड्यात आढळली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. खड्डे खोदून ते उघडेच ठेवण्यात आले आहे. कंत्राटदार आणि प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा इशारा फलक लावले नव्हते. या निष्काळजीपणामुळेच नायराचा नाहक बळी गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चिखलदराचे ठाणेदार प्रविणकुमार पाटील घटनास्थळी रवाना झाले होते. दरम्यान या घटनेचा पुढील तपास चिखलदरा पोलिस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *