Headlines

बार्शी टेक्स्टाइल मिल सुरूसाठी मोदींनाच साकडे:ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल शिंदे सेनेच्या 13 खासदारांसोबत पंतप्रधान मोदींना भेटणार‎




कोरोना काळापासून बंद असलेल्या बार्शी टेक्स्टाइल मिलमधील कामगारांचे प्रलंबित वेतन, इतर देयके आणि मिल पुन्हा सुरू करण्याच्या प्रश्नावर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांनी दिली. यासाठी शिवसेनेच्या १३ खासदारांचे शिष्टमंडळ खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे प्रमुख तथा विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी दिल्याची माहिती सोपल यांनी दिली. मुंबईत सचिन अहिर यांची भेट घेऊन आमदार दिलीप सोपल यांनी बार्शी टेक्स्टाइल मिलच्या प्रश्नावर चर्चा केली. मार्च २०२० पासून बंद असलेल्या या मिलमधील कामगारांची बिकट परिस्थिती, थकीत वेतन, इतर देयके आणि मिल सुरू करण्याची गरज सांगितली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *