![]()
खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या खत वितरण प्रक्रियेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या डिजिटल ॲपमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. खत बुकिंगसाठी कृषी विभागाने लागू केलेल्या या नव्या प्रणालीमुळे शेतकरी, कृषी सेवा केंद
.
खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. अशा वेळी वेळेत खते उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असताना नव्या ॲपमधील तांत्रिक त्रुटींमुळे खत वितरण प्रक्रियाच संथ झाली आहे. ॲप वारंवार बंद पडणे, सर्व्हर प्रतिसाद न देणे, ओटीपी उशिरा मिळणे, नोंदणी प्रक्रियेत अडथळे येणे यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात असल्याची तक्रार आहे. ग्रामीण भागात ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कची समस्या अद्याप गंभीर आहे. अनेक गावांमध्ये
आळंद | फुलंब्री तालुक्यात खत खरेदीसाठी सक्तीच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी, खत विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. सर्व्हरची संथ गती. तांत्रिक अडचणी. खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. विक्रेत्यांचीही मोठी ओढाताण सुरू आहे. शासनाच्या नवीन नियमांनुसार खत विक्रीसाठी पीओएस मशीनवर आधार कार्डाद्वारे ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
फुलंब्री | खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासू नये, ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे खत वितरण थांबू नये यासाठी फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, विभागीय कृषी संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र दिले. युरिया खतांचा मुबलक पुरवठा करा, शेतकऱ्यांचे अर्ज ऑफलाइन स्वीकारा, अशी मागणी त्यांनी केली. पत्रात त्यांनी म्हटले आहे की जिल्हाभरात खरीप हंगामाची पूर्वमशागत अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकरी खत खरेदीसाठी सज्ज आहेत. मात्र खत विक्री केंद्रांवरील ई-पॉस प्रणालीत सतत सर्व्हर त्रुटी येत आहेत. नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांना खत बुकिंग करता येत नाही. तर अनेक ज्येष्ठ, अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइलच उपलब्ध नसल्याने ते पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहत आहेत. परिणामी शासनाची डिजिटल व्यवस्था शेतकऱ्यांसाठी सुविधा ठरण्याऐवजी डोकेदुखी बनल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, कृषी सेवा केंद्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. खत वितरणात निर्माण झालेल्या अडचणी, शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि विक्रेत्यांवरील ताण याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर भुमरे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन परिस्थितीची गंभीरता निदर्शनास आणून दिली.