![]()
शिवना येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम वर्षभरापासून रखडले आहे. खालच्या तीन वर्ग खोल्या समग्र शिक्षा अभियानातून पूर्ण झाल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिल्या मजल्याचे मंजूर बांधकाम पूर्ण होणे बाकी आहे. यासंदर्भात दै दिव्य मर
.
वर्षभरापूर्वी मोडकळीस आलेल्या शाळा खोल्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. संबंधित कंत्राटदाराने तळ मजल्याचे काम संथ गतीने पूर्ण केले खरे पण वरचा मजला अजूनही सापळा बनून उभा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने नुकतीच शिवना केंद्रातील शाळांची मान्सूनपूर्व तपासणी नुकतीच पूर्ण केली आहे. त्यामुळे केंद्रातील अनेक शाळांची दयनीय अवस्था उजेडात आली आहे. याच कारणामुळे सरकारी शाळेत पाल्यांचा प्रवेश देण्यासाठी अनास्था दिसून येत असून नाइलाजाने खाजगी महागड्या शाळेत प्रवेश द्यावा लागत आहे. शाळांची भौतिक परिस्थिती सुधारल्यास सरकारी शाळांना जुने दिवस येतील असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.