Headlines

खल्लारवासियांचा दर्यापूर तहसीलसमोर विविध मागण्यांसाठी एल्गार:बससेवा, रस्ते, पाणी, स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन




अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दर्यापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ॲड. धर्मेंद्र आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेश कुरळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात अनेक मागण्या नमूद केल्या आहेत. बस स्टँड ते खल्लार गावापर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून खराब असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याचे तातडीने काँक्रेटीकरण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, दर्यापूर ते आसेगाव मार्गावर धावणाऱ्या बसफेऱ्या खल्लार गावातून सोडाव्यात, अशीही मागणी करण्यात आली. मलकापूर येथे जलकुंभ बांधण्यात आला असला तरी, पाईपलाईन न जोडल्याने पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. ती तातडीने सोडवण्याची मागणी आंदोलकांनी केली. याव्यतिरिक्त, खल्लार येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ दोनच शिक्षक कार्यरत असल्याने, तेथे तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली. खल्लार, लांडी आणि मलकापूर येथे स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी भूमिकाही आंदोलकांनी घेतली. यावेळी डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांच्यासोबत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. आंदोलनात ॲड. आठवले आणि कुरळकर यांच्यासह सदानंद गोबरे, शेख कलाम, धीरज राऊत, गौतम दामले, प्रवीण आठवले, पंकज सावरकर, किशोर माहुरे, संजय खंडारे, विनोद मोहोड, डिगांबर खंडारे, रफिक बेग, सत्तार शहा, देवेंद्र मोहोड, गजानन खंडारे, श्याम थोरात, शुभम कुरळकर, राजेंद्र वर्धे, अमोल नेतनराव, विनोद गुडधे, ज्ञानेश्वर जांभळे, शेख मोहम्मद, शेख सलिम, रिजवान बेग, मिलिंद कुरळकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *