Headlines

खुलताबाद नगर परिषदेत कर्मचाऱ्यांनी‎केले काळ्या फिती लावून आंदोलन‎:कन्नडच्या मुख्याधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरण; दोषींवर कारवाईची मागणी




खुलताबाद कन्नड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्यावर शासकीय निवडणूक कर्तव्य बजावत असताना झालेला कथित भ्याड हल्ला आणि धक्काबुक्कीच्या निषेधार्थ खुलताबाद नगर परिषद कमालीची आक्रमक झाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून खुलताबाद नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १३) हाताला काळ्या फिती बांधून ‘काम बंद’ न करता मूक निषेध नोंदवण्यात आला. तसेच संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना थेट निवेदन सादर करत, शासकीय यंत्रणेवर हात टाकणाऱ्या मुजोर आरोपींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कन्नड येथील अहिल्याबाई होळकर सभागृहातील शिबिराचे कामकाज पूर्ण करून मुख्याधिकारी रवींद्र लांडे हे पुढील शासकीय कामासाठी निघाले होते. ​वाहन चाळीसगाव रोडवरील शहीद अब्दुल हमीद चौकात आले असता संशयितांनी त्यांचे वाहन अडवले. पालिका कर्मचारी प्रदीप सीताराम आल्हाट, त्यांची आई शकुंतलाबाई, पत्नी, बहीण कल्पना आल्हाट आणि पंकज सुरवसे यांनी वाहनाचा दरवाजा उघडून मुख्य अधिकाऱ्यांना बाहेर ओढले. धक्काबुक्की केली आणि थेट जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप कर्मचारी संघटनेने निवेदनात केला आहे. आंदोलनात कर्मचारी संघटनेचे रुस्तुम फुलारे, अंकुश भराड, अश्विनी नंद, श्री. चौंडेकर, जे. आर. बोचरे, मनीषा लघाने, किशोर मोरे, एल. एम. शेजूळ, गणेश रोठे, राजेंद्र वाघ, अशोक भंडारे, फेरोज बेग, श्रीमती सोंडवले, भानुदास सोनवणे, संतोष आव्हाड, शेख अझरुद्दीन, सतीश भालेराव, ऋषिकेश सोनवणे उपस्थित होते. खुलताबाद नगर परिषदेत कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून आंदोलन.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *