![]()
कसाबखेडा परिसरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या निष्पाप बालकाचा झालेला अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक मृत्यू आणि त्यानंतर संपूर्ण तालुक्यात संताप उसळला. खुलताबाद शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ
.
येत्या काही दिवसांत जगप्रसिद्ध हजरत जर जरी बक्ष दर्गा उरुस आणि पवित्र श्रावण महिन्यानिमित्त भद्रा मारुती मंदिर परिसरात देश-विदेशातून लाखो भाविक दाखल होणार आहेत. अशा गर्दीच्या काळात शहरातील मोकाट कुत्र्यांचे कळप भाविकांसाठी आणि स्थानिकांसाठी मोठ्या धोक्याचे कारण ठरू शकतात. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता भटक्या कुत्र्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे आणि शहरात कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी आक्रमक मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मोठी उपस्थिती
र तात्काळ कारवाई न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे. निवेदन देतेवेळी गटनेते गजानन फुलारे, नगरसेवक अनिस जहागीरदार, नगरसेवक तोसिफ शेख, वाजिद शेख, अरुण तबारे, रवी बारगळ, अभिषेक बळी, राजू लिंगायत, फैजान बेग, किरण फुलारे आणि अलिओद्दीन शेख उपस्थित होते.