![]()
जायकवाडी धरणात पाण्याची भर सोमवारीही कायम राहिली असून धरण आता ६० टक्के उपयुक्त जलसाठ्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त जलसाठा ५८.१२ टक्क्यांवर पोहोचला असून ४४.५५ टीएमसी (१२६१.७९६ दलघमी) जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. वरच्या धरण साखळीतून सुरू असलेल्या विसर्गामुळे नाथसागराकडे ५६ हजार २९० क्युसेकची आवक कायम असून पुढील काही दिवसांत जलसाठा आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे, तर आज दहा वाजेपर्यंत ६० टक्के पाणी साठा होईल, असे पाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी सांगितले. मागील वर्षी याच दिवशी ८० टक्केहून अधिक पाणीसाठा होता. धरणाची पाणीपातळी १५१३.३८ फूट इतकी झाली असून धरणातील एकूण जलसाठा ७०.६२ टीएमसी इतका आहे. धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ७६.६७ टीएमसी असल्याने धरण लवकरच आणखी भरून पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या गरजा पुढील वर्षभरासाठी उपयुक्त असतील, असे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी सांगितले. मराठवाड्याच्या पिण्याचे पाणी व सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याची आवक बघता लवकरच धरण भरेल, अशी अपेक्षा आहे. आणखी जोरदार आवक सुरू राहिली तर धरण शंभर टक्के पुढील काही दिवसांत भरेल. त्यामुळे मराठवाड्याचा पाणीप्रश्न, शेतीचा आणि उद्योगाचा प्रश्न मिटणार आहे. गंगापूरमधून ४,९४७, कडवा २,३१९, भावली ८२२, पालखेड ३,४८०, ओझरखेड ८७२, दारणा ५,३३०, नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून ४६,२२७, पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील साठा सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे, पाच दिवसांपूर्वी ३१ टक्क्यांच्या आसपास असलेला जलसाठा आता ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. गणेश हासे, कार्यकारी अभियंता.
Source link
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 60%; गेल्या चोवीस तासांत 7 टक्क्यांनी वाढ:गेल्यावर्षी याच दिवशी 80 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता