Headlines

गडचिरोलीत नक्षलवादमुक्त वातावरणात दिवाळी साजरी:जिल्ह्यातील 70 पोलीस केंद्रांवर नागरिकांसोबत कार्यक्रम; दुर्गम गावांत मिठाई, फटाके आणि फराळाचे वाटप




तीन दशकांच्या दहशतीनंतर गडचिरोलीत यंदा पहिल्यांदाच भयमुक्त वातावरणात दिवाळी साजरी झाली. जिल्ह्यातील ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रांवर नागरिकांसोबत ‘नक्षलमुक्त दिवाळी’ साजरी करण्यात आली. एकेकाळी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गावात कोण येणार, कोण जाणार आणि कोणाशी बोलणार, यावरही नियंत्रण होते. विकासकामांना विरोध, रस्त्यांची जाळपोळ, भूसुरुंग स्फोट आणि पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून आदिवासींच्या हत्या होत होत्या. सरकारी यंत्रणेला गावांपर्यंत पोहोचणेही कठीण होते. मे २०२६ मध्ये ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’नंतर जिल्ह्यातील नक्षलवादी संघटनेचे अस्तित्व संपल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा दहशतीशिवाय दिवाळी साजरी झाली. पोलिसांनी हा आनंद दुर्गम गावांपर्यंत पोहोचवला. रविवारी, ८ नोव्हेंबरला जिल्ह्यातील पोलीस केंद्रांवर कार्यक्रम झाले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी अतिदुर्गम बिनागुंडा येथे नागरिक आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा यांनी गर्देवाडा, गोकुल राज जी. यांनी पेंढरी, तर हर्षवर्धन बी. जे. यांनी जिमलगट्टा येथे नागरिकांसोबत सण साजरा केला. इतर केंद्रांवर मिठाई आणि फटाके वाटण्यात आले. नवजीवन वसाहतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले. पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी, प्रोजेक्ट कृषी समृद्धी, सेवा मित्र मंडळ आणि आदर्श मित्र मंडळ (पुणे) यांच्या समन्वयातून अन्नधान्य आणि फराळाचे वाटप करण्यात आले. सुरक्षेसोबत विश्वासालाही प्राधान्य नक्षलवादमुक्त गडचिरोली घडवण्यासाठी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेसोबत सामाजिक सलोखा, लोकसहभाग आणि नागरिकांचा विश्वासही महत्त्वाचा आहे, असे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते मजबूत करून शांततामय आणि विकसित गडचिरोलीसाठी असे उपक्रम पुढेही सुरू राहतील, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *