![]()
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली या दुर्गम व आदिवासी तालुक्यांत मोठी आरोग्य- पर्यावरण क्रांती आकाराला आली आहे. या भागात तब्बल २० हजार धुररहित सुधारित चुलींचे वितरण पूर्ण करण्यात आले. यातूनच हे शक्य झाले आहे. क्लीन मॅक्स उर्जित एलएलपी आणि क्लायमेटसेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावणारा ठरत आहे. या उपक्रमाचे सर्वात मोठे यश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांची धुरापासून झालेली सुटका. या सुधारित व धुररहित चुलींमुळे घरातील प्रदूषण १०० टक्के थांबले. आतापर्यंत १९ हजार ६०० हून अधिक कुटुंबांनी या उपक्रमाचा थेट लाभ घेतला. वनसंवर्धनासाठी उपयुक्त हा उपक्रम केवळ आरोग्यापुरता मर्यादित नसून वनसंवर्धनासाठी मैलाचा दगड ठरला आहे. या चुलींच्या वापरामुळे दरवर्षी तब्बल ४१ हजार टनांहून अधिक जळतणाच्या लाकडाची बचत होणार आहे. जंगलांवरचा ताण कमी झाल्यामुळे जैवविविधतेचे रक्षण होईल . या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे दरवर्षी अंदाजे ९ हजार २०० टन कार्बन डायऑक्साइड हरितगृह वायूचे उत्सर्जन टळणार आहे.
Source link
गडचिरोलीत 20 हजार धूररहित चूल वापर, कार्बन उत्सर्जन थांबले:सुधारित चुलींमुळे घरातील प्रदूषण 100 टक्के थांबले