![]()
सेनगाव शहराजवळ भरधावपिकअपने दुचाकीला धडक दिल्यानेदोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटनाशनिवारी रात्री ११ वाजण्याच्यासुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षकसेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाणयेथील रहिवासी होते. दोघे शिक्षकधोंडे जेवणासाठी रिसोडला गेलेहोते, परत येताना अपघात झाला. वरूड चक्रपाण येथील शिक्षकसंतोष देसाई व गजानन पत्की हे दोघेशनिवारी जनगणनेचे कर्तव्य पारपाडून, रिसोड येथे पाहुण्यांकडेभेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणीपाहुण्यांना भेटून, धोंडे जेवणानंतरदुचाकीने परत सेनगावकडे निघालेहोते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारासत्यांची दुचाकी सेनगाव शहराजवळआली असताना भरधाव पिकअप चालकाने त्यांच्या दुचाकीला धडकदिली. या अपघातात दुचाकीवरीलदोघेही रस्त्यावर कोसळून गंभीरजखमी झाले. या अपघाताचीमाहिती मिळताच सेनगाव पोलिसठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षकदीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथपाटील, रवीकिरण खंदारे, जमादारपरमेश्वर क्षिरसागर यांनी घटनास्थळीधाव घेतली. पोलिसांनी दोघांनासेनगाव ग्रामीण रुग्णालयात आणले.मात्र दोघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनीतपासून मृत घोषीत केले. दोघांच्या पश्चात आई, वडील, मुलगा, मुलगी या अपघातातील मृत दोघे शिक्षकआपल्या कुटुंबाचा एकमेव आधारहोते. दोघांच्या पश्चात वृद्ध आई,वडील, पत्नी, एक मुलगा, एकमुलगी असा परिवार आहे. त्यामुळेदोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगरकोसळला आहे. ग्रामस्थांना हुंदका अनावर अपघात झाल्याची माहितीमिळाल्यानंतर घटनास्थळी धावलो.घटनास्थळी पाहणी केली असतातेथे रक्तामांसाचा सडा पडला होता.पिकअप घटनास्थळी दिसून आलेतर दुचाकीचा चक्काचूर झाला होता. घटनास्थळावरील चित्रपाहिल्यानंतर उपस्थित गावकऱ्यांना हुंदका अनावर झाला. -शरद अदमाने, ग्रामस्थ, वरुड चक्रपाण
Source link
दुचाकीला पिकअपची धडक; धोंडेजेवणानंतर परतणारे 2 शिक्षक ठार:सेनगाव शहराजवळ मध्यरात्री अपघात