![]()
अश्लील फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 29 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तुकाराम गणपत गायकवाड (वय 35) याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तुकारामची फिर्यादी महिलेच्या पतीशी ओळख होती. याच मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने मे 2019 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पीडितेच्या घरी वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. इलेक्ट्रॉनिक पुरावे ठरणार निर्णायक आरोपीने ब्लॅकमेलिंगसाठी समाजमाध्यमांचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सायबर तपासाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, व्हायरल केलेले फोटो आणि अन्य तांत्रिक पुरावे अद्याप हस्तगत करणे बाकी आहे. हे पुरावे गोळा केल्यानंतर आरोपीच्या गुन्ह्याची व्याप्ती आणि त्याने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिस निरीक्षक दिलीप गाडे करत आहेत. औशात तरुणावर चाकूहल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा औशा शहरातील काझी कॉम्प्लेक्स परिसरातील कोहिनूर हॉटेलमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास एका तरुणावर चाकूने वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी औसा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हारुण मुसा बागवान (वय 34,रा. समतानगर, औसा) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी उसामा नांदुर्गे याने ”तू माझ्या चुलत्यांना काय म्हणालास?” अशी विचारणा करत हारुण यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या पाठीवर, डाव्या हाताच्या मनगटावर आणि करंगळीवर चाकूने वार केले. यावेळी बबलू ऊर्फ मुजोफरीदीन नांदुर्गे आणि अज्जू यांनीही शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी औसा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source link
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेचे 7 वर्षे शोषण:पतीच्या मित्रावर उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल