![]()
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र आता हवामान विभागाने राज्यासाठी दिलासा देणारा अंदाज जाहीर केला आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १५ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अद्याप मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. सध्या निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे राज्यात १२ ते १४ सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे १५ सप्टेंबरपासून पावसाचा जोर अधिक वाढेल, असा अंदाज आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिकसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी राज्यातील हवामानात वेगाने बदल होत असून अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे: १२ सप्टेंबर: मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. १३ सप्टेंबर: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट. १४ सप्टेंबर: नाशिक आणि पुणे (घाटमाथा), अहिल्यानगर तसेच रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा हा अंदाज खरा ठरल्यास, ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या माना टाकलेल्या पिकांना मोठे जीवदान मिळणार असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. या काळात नागरिकांनी विजांच्या कडकडाटापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. सैटेलाइट नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पहा ————- हेही वाचा.. उत्तराखंडमध्ये 170 फूट लांब पूल वाहून गेला:छत्तीसगडमध्ये 3 कॉलेज विद्यार्थी नदीत बेपत्ता; बिहारच्या 47 लाख लोकांना पुराचा फटका उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिथौरागढमधील कुलागड ओढ्यावरील १७० फूट लांबीचा ‘बेली ब्रिज’ (तात्पुरता पूल) पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. यामुळे चीन सीमेजवळील व्यास, दारमा आणि चौदांस खोऱ्यांशी असलेला संपर्क तुटला आहे. हा पूल गत २७ ऑगस्ट रोजीच उभारण्यात आला होता. त्याआधीचा पूल १८ ऑगस्ट रोजी दरड कोसळल्यामुळे कोसळला होता. छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा जिल्ह्यात हसदेव नदीच्या प्रखर प्रवाहात तीन महाविद्यालयीन विद्यार्थी वाहून गेले. शुक्रवारी हे तिघे बिलासपूरच्या चौकसे कॉलेजमधील इतर आठ विद्यार्थ्यांसह सहलीसाठी देओरी गावात आले होते. नदीकाठी सेल्फी घेत असताना एक विद्यार्थी घसरून पडला. त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेले इतर दोन विद्यार्थीही प्रवाहाबरोबर वाहून गेले. या तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सविस्तर वाचा
Source link
गणपतीत वरुणराजा बरसणार!:राज्यातील अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार