Headlines

गणेशोत्सवाच्या गर्दीत महिलांचे दागिने चोरीला:कसबा पेठ आणि शनिपारमध्ये तीन घटना; फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल




गणेशोत्सवाच्या गर्दीत देखावे पाहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कसबा पेठ आणि शनिपार परिसरात या घटना घडल्या. या प्रकरणी चोरांविरुद्ध फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौक परिसरात एका महिलेच्या गळ्यातील १५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले. या प्रकरणी एका महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात राहतात. त्या १८ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता जिजामाता चौक परिसरातील नवग्रह मंडळाजवळून जात असताना ही घटना घडली. पोलिस हवालदार अजिज शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत. सदाशिव पेठेतील शनिपार मंडळ परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचे दागिने चोरण्यात आले. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील १२ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले. याबाबत महिलेच्या पतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिस उपनिरीक्षक मोकाशी तपास करत आहेत. शनिपार परिसरात २० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता धनकवडीत राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील १५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरण्यात आले. या प्रकरणी महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हवालदार एस. गोंजारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. गणेशोत्सवात महिलांचे दागिने, रोकड आणि मोबाइल चोरीच्या घटना रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. हेही वाचा.. कसबा गणपतीचा 134 वर्षांचा उत्सव, यंदा नव्या सांस्कृतिक रूपात:वाराणसीची गंगा आरती, आयटी दिंडीसह अनेक कलाविष्कार पुणेकर अनुभवत आहेत ढोल-ताशांचा निनाद, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात यंदा मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात पुणेकर कला, संस्कृती आणि आधुनिक पुण्याची स्पंदने अनुभवत आहेत. १३४ वर्षांची परंपरा जपताना, काळाबरोबर बदलणाऱ्या पुण्याचा चेहराही या उत्सवात दिसतो आहे. यंदाच्या कार्यक्रमांचा नजराणा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *