Headlines

गवळीशिवरा जि.प. शालेय व्यवस्थापन समितीची निवड:अध्यक्ष भारत गवळी, उपाध्यक्षपदी विलास म्हस्के‎




गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया बुधवारी पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी भारत कडुबा गवळी तर उपाध्यक्षपदी विलास एकनाथ म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शाळेतील पहिली ते नववीच्या वर्गांमधून पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. यात भारत रामदास सोनवणे, नवनाथ श्यामराव गवळी, मधुकर रावसाहेब गवळी, सविता राज गवळी, संध्या कडू धनुरे, दत्तू करे, सुनंदा अशोक गवळी, भारत गवळी, तैय्यबा जाकीर शेख, कविता शाईनाथ म्हस्के, पांडुरंग गवळी, विलास एकनाथ म्हस्के व समीर शेख यांचा समावेश आहे. केंद्रप्रमुख कडू बडोगे, मुख्याध्यापक सुरेश शेळके, पंकज भोसले व प्रमोद जाधव यांनी ही संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली. निवडीनंतर पंचायत समितीचे सभापती सुनील केरे, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत गवळी, उपसरपंच योगेश केरे यांच्यासह ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष भारत गवळी यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्तेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *