Headlines

गवळीशिवरा येथील पंचमी उत्सवाची सांगता




गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथील श्री महारुद्र मारुती संस्थानच्या पंचमी महोत्सवाची सांगता गुरुवारी बोहड्याने झाली. या पंचमी उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली होती. पाच दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात झाली. यावर्षी पंचमी उत्सवाचे यजमान रामदास लक्ष्मण गवळी होते. या भाविकाने एक दिवस पंचमी उत्सवाचा खर्च करून नवस पूर्ण केला. तसेच लोकनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांना लक्ष्मण खंडू मांडे यांच्यामार्फत सहा दिवस अन्नदान करण्यात आले. पंचमी उत्सव कालावधीत लाखों भाविक दर्शनासाठी येतात. नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. गुळ, पेढे, नारळ मुलांना नाच्याच्या कडावर देण्याचा नवस तसेच भाविकांचे अनेक प्रकारचे नवस पूर्ण करण्यात आले. यशस्विसाठी महारूद्र संस्थानचे अध्यक्ष संताराम केरे, उपाध्यक्ष पाडुरंग केरे, सचिव सुखदेव गवळी, कोषाध्यक्ष पांडुरंग गवळी, सहसचिव अंबादास केरे, विश्वस्त मारोती गवळी, विलास पांडे, सुभाष केरे, लिपिक गणेश गवळी, पुजारी नागेश -योगेश पोळसह सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, भजनी मंडळासह मंदीर प्रशासन तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. आरोग्य केंद्रातर्फे शिबिर पंचमी उत्सव दरम्यान महारुद्र संस्थांकडून पिण्याचे पाण्याची व्यवस्था तसेच भाविकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. शिल्लेगाव पोलिसांनी पंचमी काळात बंदोबस्त बजावला. पंचमी कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता संतोष पाटील जाधव यांच्या प्रयत्नातून तसेच लासूर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून भाविकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच संतोष जाधव यांच्या प्रयत्नातून पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *