Headlines

गायन, भजन ते बुद्धिबळ… नगरमध्ये महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धा:गायन स्पर्धेत रिया मणियारला विजेतेपद, संगीत वाद्यमध्ये प्रणिका हेडा प्रथम‎



श्री माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बॅडमिंटन स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. काबरा परिवार यांच्या प्रायोजकत्वाखाली झालेल्या या स्पर्धेत ‘शटल स्मॅशर’ संघाने विजेतेपद पटकावले तर ‘निंजा

.

इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे गायन, संगीत वाद्य व भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १६ वर्षांखालील गायन स्पर्धेत आर्या अमित सोनी हिने प्रथम, तर रियांशी साजन राठी उपविजेती ठरली. १६ वर्षांवरील गायन स्पर्धेत रिया किरण मणियार हिने विजेतेपद मिळविले. चेतना रविकांत काबरा व रचेत रविकांत काबरा यांनी अनुक्रमे उपविजेतेपदे मिळवले. दुहेरी गट गायन स्पर्धेत नेहा नितीन बजाज व प्रिशा सोनी या जोडीने बाजी मारली. संगीत वाद्य स्पर्धेत प्रणिका हेडा हिने प्रथम क्रमांक मिळवला. रेवा राहुल झंवर व स्पर्श बिहाणी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. भजन स्पर्धेत शितल बिहाणी यांनी विजेतेपद मिळविले तर सानिका बिहाणी तसेच अर्चना लड्डा व अर्चना लड्डा यांनी उपविजेतेपदे मिळवले. महेश हस्ताक्षर, हस्तकला, चित्रकला व बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटात ईशानी धूत विजेती व आर्या लड्ढा उपविजेती ठरली. १० वर्षांखालील गटात रुद्रांश शामसुंदर भुतडा याने प्रथम क्रमांक मिळविला. साईश भराडिया व विराज बिहाणी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. १८ वर्षांखालील गटात पार्थ झंवर विजेता व रमण लाहोटी उपविजेता ठरला. खुल्या गटात यश कालिया याने विजेतेपद मिळविले तर कृष्णा अट्टल उपविजेता ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *